Police take action against a catering driver who sells biryani in violation of Kovid rules | कोविड नियमांचे उल्लंघन करीत बिर्याणीची विक्री करणाऱ्या कॅटरिंग चालकावर पोलिसांची कारवाई

ठामपाच्या अधिकाऱ्यांनी दुकान केले सील

ठळक मुद्दे ठामपाच्या अधिकाऱ्यांनी दुकान केले सील

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोविड -१९ नियमांचे उल्लंघन करीत विना मास्क तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन न करता सर्रास बिर्याणीची विक्री करणाºया कॅटरिंग चालकावर डायघर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. तर ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी हे दुकान पाच दिवसांसाठी सील केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डायघर परिसरातील दोस्ती कॉम्प्लेक्स येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव हे आपल्या पथकासह १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी मुंब्रा पनवेल रोडलगत असलेल्या एसएमएन स्कूलच्या समोरील ‘लजीज कॅटरिंग’ या दुकानामध्ये विना मास्क, सोशल डिस्टसिंग न पाळता तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने कोणत्याही नियमांचे पालन न करता बिर्याणीची विक्र ी केली जात असल्याचे आढळले. हीच माहिती पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग अधिकाºयांना दिली. ही माहिती मिळताच दिवा प्रभाग समितीचे अधिकारी दत्ता गोंधळी यांनी पाच दिवसांसाठी हे दुकान सील केले. त्याचबरोबर दुकान मालकाकडून एक हजारांचा दंडही वसूल केला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल चालकांनी तसेच व्यापाºयांनी कोरोना संबंधिचे निर्बंध काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन करणाºयांवर मात्र, अशी कारवाई केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Police take action against a catering driver who sells biryani in violation of Kovid rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.