शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक काेंडीतील दहावी, बारावीच्या परीक्षार्थींच्या मदतीला येणार पाेलिसांचे  रायडर्स

By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2026 18:27 IST

रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करा: ५४ रायडर्स सज्ज

जितेंद्र कालेकरलाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पाेलिसांनी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतुक पोलीस सज्ज झाले आहेत. त्यानुसार, रस्त्यांवर ५४ रायडर्स तैनात केले आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या व्हॉटसॲप क्रमांक आणि वाहतूक हेल्पलाईनसह १८ वाहतुक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. परिक्षेला पोहचण्यासाठी रस्त्यावर काेणतीही समस्या उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी शुक्रवारी केले.

ठाण्याचे पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे आणि सह पाेलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक (दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अनुक्रमे १० फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एक ते पाच परिमंडळांमध्ये इयत्ता बारावीची १२६ केंद्रे तर दहावीची २२३ केंद्रे आहेत. या परिक्षा केंद्रांवर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास ५४ रायडर्स सज्ज ठेवल्याची माहिती उपायुक्त शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या वाहतूक नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ८२८६ ३००३०० आणि ८२८६ ४००४०० तसेच वाहतूक नियंत्रण व्हॉटसॲप क्रमांक ७०३९००३८६६ आणि १८ वाहतुक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत. याशिवाय, नियंत्रण कक्षातही तीन वाहने तैनात ठेवली जाणार आहेत. परिक्षाकाळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहचून वाहतुकीतील अडथळे दूर करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परिक्षा कालावधीत पालकांनी तसेच, नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाचेच्या वतीने उपायुक्त शिरसाट यांनी केले.

टॅग्स :ssc examदहावीPoliceपोलिस