लैंगिक अत्याचार करून खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:32 AM2020-01-13T00:32:48+5:302020-01-13T00:32:55+5:30

साडेतीन लाख रुपये उकळले : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

Police report overturning sexual ransom | लैंगिक अत्याचार करून खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद

लैंगिक अत्याचार करून खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद

Next

ठाणे : लैंगिक अत्याचार करून साडेतीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या सोहेल राजपूत (२४, रा. राबोडी-२, ठाणे) या पोलिसांच्या कथित खबºयाला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केलीे. संबंधित पीडित तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची तसेच तिला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.

मुंब्रा परिसरातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय पीडित तरुणीची आणि सोहेलची एका कार्यक्रमात तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. याच मैत्रीतून पुढे त्याने लग्नाच्या भुलथापा देऊन तिच्यावर वारंवार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ३ एप्रिल २०१८ ते ८ जानेवारी २०१९ या १० महिन्यांच्या कालावधीत सुरूहोता. तसेच तिचे अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन पैशांसाठी ब्लॅकमेल केले. त्याद्वारे तिच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये आणि दोन लाख रुपये अशी साडेतीन लाखांची खंडणी वसूल केली. तिचा दोन महिन्यांचा गर्भपातही घडवून आणला. तिला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्याची धमकी दिली. तिला त्याने पट्ट्याने मारहाण केली. अखेर ८ जानेवारी २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.एच. चौगुले यांच्या पथकाने सोहेल याला ८ जानेवारी रोजी अटक केली.

पोलिसांकडे करायचा खबºयाचे काम : ठाणे शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी जगतातली ‘टीप’ देण्याचे काम सोहेल करीत असल्यामुळे त्याची अनेक पोलीस अधिकाºयांकडे ‘ऊठबस’ आहे. याच ओळखीतून आपल्यावर कोणीही कारवाई करणार नाही, असा सोहेलचा समज होता. यातूनच त्याच्या खंडणी आणि धमकी देण्याच्या कारवाया सुरू होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Police report overturning sexual ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस