शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाची २७ वर्षांनी उकल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:07 AM

ठाणे पोलिसांनी लावला छडा : आरोपीचा मात्र सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे उघड

ठाणे : पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग पाटील यांच्या खून प्रकरणाचा तब्बल २७ वर्षांनी उलगडा झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच महिने तपास करून आरोपी इबरार नन्हे खान याच्या पत्नीचे दिल्ली येथील घर गाठले. पण, २०१२ मध्येच त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानंतर पोलीस हताश झाले.

पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी शोध घेऊनही तो मिळाला नव्हता. पाटील यांचे वडील पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना भेटले. त्यांनी मुलाचा मारेकरी खानच्या अटकेची मागणी जून २०१९ मध्ये केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी हा तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनी तिचे घरही शोधले. सखोल चौकशीत २०१२ मध्येच एका आजाराने इबरारचा मृत्यू झाल्याची माहिती ठाकरे यांच्यासह पोलीस हवालदार आनंदा भिलारे, विक्रांत कांबळे, राहुल पवार, रवींद्र पाटील आणि तौशिफ पठाण आदींच्या तपासात समोर आली. कठोर परिश्रम घेत आरोपीचा पाठपुरावा केला. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने ही फाइल आता कायमचीच बंद करावी लागणार असल्याचे शल्य तपास पथकातील अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. इबरारला १९९३ मध्ये मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याने खरे नाव लपवून सलीम खान अशी ओळख सांगितली होती. त्यावेळी तो जामिनावर सुटला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.आरोपीला पकडताना झाली होती हत्या : उपनिरीक्षक महेंद्रसिंग यांची कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेमणूक होती. इबरार हा फरारी आरोपी शहाड पुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २३ जुलै १९९२ रोजी रात्री आपल्या पथकासह पाटील त्याला पकडण्यासाठी गेले होते. रिक्षाने जातानाच त्यांना तो दिसला. तेव्हा मोठ्या धाडसाने त्यांनी त्याचा पाठलागही केला. मात्र, पुलाच्या खांबाआड लपलेल्या खानने पाटील यांच्यावर चॉपरने नऊ वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इबरार खान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथमध्ये खानची त्यावेळी दहशत होती.