पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:54 IST2021-04-02T04:53:49+5:302021-04-02T04:54:15+5:30

अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा एका अपघातात मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

Police officer killed in accident | पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू  

पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू  

अंबरनाथ : अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा एका अपघातात मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी चंद्रकांत भागवत हे बदलापूरहून अंबरनाथच्या दिशेने येत असताना अंबरनाथ एमआयडीसी रोडवरील वैभव हॉटेल चौकात भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडक देत थेट भागवत यांच्या दुचाकीवर आला. भागवत यांच्या दुचाकीबरोबरच या ट्रकने एका कारलाही धडक दिली. या अपघातात भागवत यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. 

Web Title: Police officer killed in accident