शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराची पोलिसांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 19:56 IST

बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिरात आलेल्या सव्वाशे प्रशिक्षणार्थींना बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण देताना एयरगनने नेमबाजी शिकवण्यात आली असल्याचे समोर आलं आहे.

मीरा रोड - मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेमध्ये विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण शिबिरात आलेल्या सव्वाशे प्रशिक्षणार्थींना बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण देताना एयरगनने नेमबाजी शिकवण्यात आली असल्याचे समोर आलं आहे. बजरंग दलाच्या एका अतिउत्साही प्रचारकाने सदर शिबिराच्या फोटोंसोबत उत्तर प्रदेशच्या शिबिरातील फोटो सोशल मिडीयावर टाकल्याने वादंग झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. त्यातच सदर शाळा भाजपा आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांची असल्याने अशा प्रकारच्या प्रशिक्षणावरून टीकेची झोड तीव्र झाली आहे.विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत येणा-या बजरंग दलाच्या कोकण प्रांताचे शौर्य प्रशिक्षण वर्ग २०१९चे आयोजन यंदा आ. मेहतांच्या शाळेत २५ मे ते १ जूनदरम्यान करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी राज्याच्या कोकण प्रांत तसेच गोवामधून एकूण सव्वाशे प्रशिक्षणार्थी आले होते. १८ ते ३५ या वयोगटातील ते सर्व होते. या प्रशिक्षणादरम्यानचे काही फोटो प्रशांत गुप्ता या बजरंग दलाच्या विस्तारकाने सोशल मिडीयावर टाकले. सेव्हन सक्वेअर एकेडमी मध्ये बजरंग दलाचे प्रशिक्षण असल्याचे देखील त्यांने नमुद केले होते. शाळेच्या वर्गात बंदुकी सोबत असणारे प्रशिक्षणार्थी व खाली ठेवलेल्या बंदुकी हे फोटो सेव्हन सक्वेअर शाळेतील होते. पण जाळपोळ व बंदुकीने फायरींग करतानाचे टाकलेले फोटो मात्र सदर शाळेतील नव्हते.दरम्यान सोशीयल मिडीयावर टाकलेल्या सदर छायाचित्रां वरुन खळबळ उडाली. मीरारोडच्या आ. मेहतांच्या शाळेत गोळीबार करणे, जाळपोळ आदीचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारी डिवायएफआय, अ‍ॅड. संजय पांडे, आम आदमीचे ब्रिजेश शर्मा आदींनी केल्या. या चे वृत्त प्रकाशित होताच टिकेची झोड उठुन पोलीस आदी यंत्रणांची धावपळ सुरु झाली. नवघर पोलीसांनी याची माहिती व चौकशी सुरु केली. शाळेतील वर्गात व परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी साठी घेणार आहोत असे निरीक्षक राम भालसिंग यांनी सांगीतले. गुप्ता ने टाकलेले फोटो सोशल मिडीया वरुन काढुन टाकण्यात आले आहेत. पोलीसांनी त्याच्या कडे सुध्दा चौकशी केली आहे.मीरा-भाईंदर बजरंग दलाचे संयोजक चंद्रकांत झा यांनी सांगीतले की, एयरगन च्या सहाय्याने शिबीरात नेमबाजी सह ज्युडो - कराटे, मल्लखांब, जमीनीवर सरकणे आदी विविध प्रकारच्या शारिरीक व आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले गेले. पण जाळपोळ वा कोणत्याही खराया बंदुका नव्हत्या. या शिवाय गोरक्षा, धार्मंतरण विरोधी प्रकार रोखणे आदी वर चर्चासत्रं झाली. सोशल मिडीयावर येथील शिबीराच्या छायाचित्रां सोबत दुसरीकडची छायाचित्रं टाकली गेली आणि कम्युनिस्ट विचारसरणींच्या काहींनी यातुन चुकीच्या तक्रारी केल्याचे झा म्हणाले. एयरगन वापरल्या यात काही चुकीचे नाही. सदर शाळा आ. मेहतांची असल्याने हा वाद जास्त वाढल्याचे ते म्हणाले. तर आ. मेहतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तक्रारदारांनी मात्र , भाजपा आमदाराच्या शाळेत अशा प्रकारचे शस्त्र हाताळणीचे तसेच धर्मांध व द्वेषकारक प्रशिक्षण शिबीर कट्टर पंथियां कडुन चालवणे मीरा भाईंदर शहरच नव्हे तर देशाचे संविधान आणि समाजासाठी घातक असल्याचे सांगत कार्यवाहीची मागणी केली आहे.