आमिषापोटी ऑनलाईन गुंतवणुक करून फसवणूक झालेली रक्कम पोलिसांनी दिली मिळवून 

By धीरज परब | Published: March 24, 2024 11:26 AM2024-03-24T11:26:54+5:302024-03-24T11:27:20+5:30

काशीमीरा येथील एका महिलेची फसवणुकीची सर्व १० लाखांची रक्कम पोलिसांनी परत मिळवून दिली आहे . 

police got the amount cheated by investing online as a lure | आमिषापोटी ऑनलाईन गुंतवणुक करून फसवणूक झालेली रक्कम पोलिसांनी दिली मिळवून 

आमिषापोटी ऑनलाईन गुंतवणुक करून फसवणूक झालेली रक्कम पोलिसांनी दिली मिळवून 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - जास्त फायदा मिळतो या आमिषाने अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊन ऑनलाईन पैसे गुंतवलेल्या व फसगत झालेल्या काशीमीरा येथील एका महिलेची फसवणुकीची सर्व १० लाखांची रक्कम पोलिसांनी परत मिळवून दिली आहे . 

इंस्टाग्राम , टेलिग्राम , व्हॉट्सअप , फेसबुक आदी समाज माध्यमांवर शेअर मार्केट वा अन्यत्र गुंतवणूक करून भरपूर फायदा कमावून देण्याचे आमिष दाखवून सायबर लुटारू हे लुटत असल्याच्या सातत्याने घटना घडत आहेत . पोलीस देखील नेहमी अश्या आमिषाला फसू नका असे आवाहन करत असतात . तरी देखील अनेक लोकं पैश्यांच्या हव्यासापोटी अनोळखी लोकांवर ऑनलाईन विश्वास ठेऊन मोठी रक्कम गमावून बसतात . 

काशीमीरा च्या हिरको भागात राहणाऱ्या प्रियंका दास पुजा ह्या महिलेने पैश्यांच्या आमिषाने अनोळखी लोकांच्या सांगण्यावरून ऑनलाईन सांगुन १० लाख २९ हजार रुपयांची फसवणुक केली होती . त्या प्रकरणी गेल्या वर्षी काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालवला होता .  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे व हवालदार  दिनेश आहेर यांनी या गुन्ह्याचा तपास करत प्रियांका यांनी भरलेले पैसे ज्या वेगवेगळ्या बँक खात्यात गेले होते ती रक्कम पाठपुरावा करून गोठवली .  त्यानंतर ठाणे  न्यायालयाकडुन आदेश मिळताच तक्रारदार यांचीसर्व रक्कम परत त्यांच्या खात्यावर वळती करण्यात आली . 

 

Web Title: police got the amount cheated by investing online as a lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.