पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या पत्नीसह तिघांना पोलीस कोठडी, चौथ्याचा शोध सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 20:12 IST2017-10-16T20:11:42+5:302017-10-16T20:12:22+5:30
आपल्याच पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या रुकय्या सलीमबहादूर खान (२६) हिच्यासह तिघांना ठाणे न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले

पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या पत्नीसह तिघांना पोलीस कोठडी, चौथ्याचा शोध सुरूच
ठाणे : आपल्याच पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या रुकय्या सलीमबहादूर खान (२६) हिच्यासह तिघांना ठाणे न्यायालयाने सोमवार, २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या तिस-या साथीदाराचा मात्र अद्यापही शोध सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपला पती सलीमबहादूर खान याने आत्महत्या केल्याचा बनाव करून रुकय्याने शरीफ शेख या प्रियकरासह तिघांच्या मदतीने १४ आॅक्टोबर २०१७ रोजी त्याचा खून केला. ही बाब शवविच्छेदनाच्या अहवालातून उघड झाल्यानंतर कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, अशोक उतेकर आणि तुकाराम पावले यांच्या पथकाने रुकय्या, शरीफ शेख आणि धनराज चव्हाण या तिघांना अटक केली. तिघांनाही ठाणे न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. शरीफ शेख आणि धनराज यांना रिक्षातून घेऊन येणाºया त्यांच्या अन्य एका साथीदाराचाही शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक उतेकर आणि तुकाराम पावले यांच्या पथकाने रविवारी अटक केली होती.