मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:34 PM2021-02-27T18:34:11+5:302021-02-27T18:34:26+5:30

मीरारोड -  कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला

Police crackdown on irresponsible people in Mira Bhayander | मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा 

मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा 

Next

मीरारोड -  कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे . एकट्या वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसात मास्क न लावणाऱ्या १६४ वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून शुक्रवार पर्यंत शहरात आता पर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा २७ हजार ८ तर कोरोना मुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ८०४ वर गेली आहे . अनेक बेजबाबदार लोकं तसेच  दुकानदार, फेरीवाले , हॉटेल - बार कर्मचारी आदी मास्क घालत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे . 

त्या अनुषंगाने आता महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच दंडात्मक रक्कम वसूल करण्याची जबाबदारी पोलिसांवर सुद्धा सोपवली आहे . प्रत्येक पोलीस ठाण्यासह वाहतूक पोलिसांना सुद्धा दंडाची पावती पुस्तके दिली गेली आहेत . 

शहरात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांवर आता प्रत्येकी ५०० रुपये दंड वसुली सुरु केली आहे . दंड न भरल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे . वाहतूक पोलिसांनी सुद्धा गेल्या दोन दिवसात नका बंदी दरम्यान मास्क न घालणाऱ्या १६४ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे . बेशिस्त लोकां कडून मास्क नसल्याने दंड वसूल करतानाच त्यांना पोलीस मोफत मास्क सुद्धा देत आहेत 

Web Title: Police crackdown on irresponsible people in Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.