Police arrested habitual accused for stealing a motorcycle | सराईत मोटारसायकल चोरटयास ठाण्यातून अटक

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईतीन मोटारसायकली हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एक लाखांच्या चोरीची मोटारसायकलीची अवघ्या दहा हजारांमध्ये विक्री करणाऱ्या साकीब उर्फ अंडया मजीद खान (२३, रा. क्रांतीनगर, राबोडी, ठाणे) या सराईत चोरटयाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या वागळे इस्टेट पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
राबोडी येथील एका चोरीच्या गुन्हयातील आरोपी वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२ येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांना मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, शरद तावडे, निवृत्ती महांगरे, पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड, संजय सोंडकर, मनोज पवार, राजेश क्षत्रीय आणि पोलीस नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी वागळे इस्टेट परिसरात सापळा रचून साकीब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून राबोडीतील दोन आणि डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून चोरीस गेलेली एक अशा तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. राबोडी येथील एका घरफोडी प्रकरणातही तो वान्टेड होता. त्याच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एक लाख ते सव्वा लाखांची मोटारसायकल तो अवघ्या दहा हजारांमध्ये विक्री करीत होता. असेच एक गिºहाईक शोधत असतांना गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. त्याला ३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Police arrested habitual accused for stealing a motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.