उल्हासनगरातील वेलनेस क्लीनिक मध्ये पोलिसांसह कुटुंबाना मिळणार मानसिक ताणतणावचे धडे, तर बुधवारी तज्ञाकडून उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:16 IST2025-10-14T16:16:01+5:302025-10-14T16:16:24+5:30
Ulhasnagar News: पोलीसासह अधिकारी व त्यांच्या कुटुंबाचे जिवन मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेत राहण्यासाठी वेलनेस क्लिनिक उभे राहिले. क्लिनिकचे उदघाटन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते झाले असून दर आठवड्याला शिबीर होणार आहे. तसेच दर बुधवारी पोलिसासह कुटुंबाला तज्ञाकडून धडे व उपचार देण्यात येणार आहे.

उल्हासनगरातील वेलनेस क्लीनिक मध्ये पोलिसांसह कुटुंबाना मिळणार मानसिक ताणतणावचे धडे, तर बुधवारी तज्ञाकडून उपचार
उल्हासनगर - पोलीसासह अधिकारी व त्यांच्या कुटुंबाचे जिवन मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेत राहण्यासाठी वेलनेस क्लिनिक उभे राहिले. क्लिनिकचे उदघाटन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते झाले असून दर आठवड्याला शिबीर होणार आहे. तसेच दर बुधवारी पोलिसासह कुटुंबाला तज्ञाकडून धडे व उपचार देण्यात येणार आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळातील पोलिसांसह त्यांचे कुटुंब मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेत राहण्यासाठी वेलनेस क्लिनिक उभे राहिले. क्लिनिकचे उदघाटन सोमवारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते झाले. या क्लिनिक मध्ये पोलिसांसह त्यांच्या कुटुंबाना मानसिक ताणतणाव मुक्त व शांततेसाठी दर आठवड्याला शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जे पोलीस मानशिक ताणतणावग्रस्त आहेत. त्यांना तज्ञाकडून सल्ला व उपचार करण्यात येणार आहे. पोलिसांचा मानसिक ताणतणाव व त्यांच्या कुटुंबात शांतता राहावे. यासाठी वेलनेस क्लिनिक सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरे यांनी दिली. पोलीस परिमंडळा मधील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रत्येकी १० पोलीस कर्मचारी मार्गदर्शन शिबिरात सहभागी होणार आहेत.
५ पोलिसांना तज्ञाकडून उपचार
पहिल्या शिबिराला ८५ पोलीस कर्मचारी व १२ अधिकाऱ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी तज्ञाचा सल्ला घेऊन, स्वतःसह कुटुंबातील व्यक्तीवर उपचार करणार आहेत. दर आठवड्याच्या शिबिरानंतर बुधवारी तज्ञाकडून पोलीस कर्मचारी व कुटूंबाना तज्ञाकडून उपचार घेतला जाणार आहे.