शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अश्लील व्हीडिओ करणाऱ्याविरुद्ध अखेर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: February 26, 2019 22:36 IST

इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुला मुलींचे चोरुन चित्रण करणाºया अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पोसिलांनी सांगितले.

ठळक मुद्दे पुन्हा केली जाणार अटकदुसऱ्या दिवशीही पोलीस ठाण्यात रहिवाशांची गर्दी कापूरबावडी पोलिसांची कारवाई

ठाणे : ढोकाळी येथील एका इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुला मुलींचे चोरुन चित्रण करणा-या अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा ११-१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याआधी विनयभंगाच्या कलम ३५४-क नुसार त्याला अटक झाली होती. आता पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या सर्व महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा ६६- ब आणि पोक्सो ही कलमेही दाखल करण्यात आली आहेत. तळ अधिक सहा मजली असलेल्या ए आणि बी विंगच्या दोन वेगवेगळया इमारतींमध्ये ८३ सदनिका आहेत. यातील ए विंगच्या इमारतीमध्ये त्याने हा चित्रणाचा प्रकार केला. इमारतीमध्ये जिन्यातून जाताना जवळच बाथरुमच्या खिडक्या आहेत. त्याच खिडक्यांमध्ये रहिवाशांच्या नकळत तो मोबाईल ठेवून चित्रीकरण करीत होता. एक १४ वर्षांची मुलगी, ११ वर्षांचा मुलगा, काही महिला आणि पुरुषांचेही त्याने या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच इमारतीमधील इतर रहिवाशांनी चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. २३ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने त्याला अटक केली. आधी हे प्रकरण सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे यांच्याकडे होते. आता ते महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांच्याकडे सोपविले आहे. त्याने मोबाईलच्या माध्यमातून गूगलमध्ये फोटो सेव्ह केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाईसाठी मंगळवारीही रहिवाशांनी कापूबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याच्या मोबाईलमधून २४ अश्लील व्हिडीओ मिळाले असून सायबर सेल क्राईमच्या मदतीने त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याची जामीनावर सुटका झाली असली तरी त्याच्यावर पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमे वाढविली आहेत. त्यामुळे जामीन रद्द होऊन त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग