धक्कादायक! स्वत:च्याच अल्पवयीन मुलाशी पिता करायचा अश्लील चाळे

By जितेंद्र कालेकर | Published: January 15, 2019 08:45 PM2019-01-15T20:45:20+5:302019-01-15T20:49:09+5:30

आपल्याच चार वर्षीय मुलाशी गेल्या तीन वर्षांपासून अश्लील चाळे करणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्या घृणास्पद चाळयांचे पत्नीने चित्रीकरण करुन ते पोलिसांना दाखवून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

 Shocking! Pornography with a minor child: accused arrested | धक्कादायक! स्वत:च्याच अल्पवयीन मुलाशी पिता करायचा अश्लील चाळे

कासारवडवली पोलिसांची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्याच्या वडवलीतील घटना पत्नीच्या तक्रारीनंतर पित्याला केली अटककासारवडवली पोलिसांची कारवाई

ठाणे: अवघ्या चार वर्षांच्या मुलाशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी वडवली गावातील एका ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वडवली गावात राहणा-या एका दाम्पत्याला एकूलता एक चार वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याशी त्याचा हा पिता गेल्या दोन वर्षांपासून अश्लील वर्तन करीत होता. घरात त्याच्यासमोर विवस्त्र वावरणे, त्याच्याशी विवस्त्र आंघोळ करणे यासह अनेक घृणास्पद प्रकार तो करीत होता. या प्रकाराला त्याच्या पत्नीने आक्षेप घेतल्यानंतर तिलाला त्याने जुमानले नाही. आधी मीरा रोड भागात ते वास्तव्याला होते. अलिकडेच ते वडवली भागात वास्तव्याला आले होते. त्याच्या या प्रकाराला कंटाळून पत्नीने कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले यांच्या पथकाने त्याला अटक केली.

 

Web Title:  Shocking! Pornography with a minor child: accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.