पॉड टॅक्सीची मोनो होऊ नये; सुरक्षितता तपासण्याच्या मंत्री सरनाईक यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:42 IST2025-08-22T12:40:45+5:302025-08-22T12:42:09+5:30

मुंबईत मोनो रेल्वेत प्रवाशांची दोन दिवसांपूर्वी घुसमट झाली होती

Pod taxis should not be monorail Minister Saranaik instructions to check safety | पॉड टॅक्सीची मोनो होऊ नये; सुरक्षितता तपासण्याच्या मंत्री सरनाईक यांच्या सूचना

पॉड टॅक्सीची मोनो होऊ नये; सुरक्षितता तपासण्याच्या मंत्री सरनाईक यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंतर्गत आणि मुख्य मेट्रोलाजोडण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर भागात पॉड टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचे सादरीकरण गुरुवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ठाण्यात करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असला तरी यासाठी संबंधित कंपनीकडून एक हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. मुंबईत मोनो रेल्वेत प्रवाशांची ज्या पद्धतीने दोन दिवसांपूर्वी घुसमट झाली तशी अवस्था पॉड टॅक्सीत होऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित कंपनीला सूचना दिल्या.

फायदा काय होणार?

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात आहे. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे.

भविष्यात अडचण येणार

कंपनीने सादरीकरण केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पीपीपी तत्त्वावरील या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. परंतु प्रकल्पाची यशस्वीतता कितपत आहे हे तपासावे लागेल, असे सांगितले.

Web Title: Pod taxis should not be monorail Minister Saranaik instructions to check safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.