शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:43 IST

नवरात्र व दसऱ्यानिमित्त ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा ठाणे जिल्ह्यात वापर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.

ठाणे - नवरात्र व दसऱ्यानिमित्त ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा ठाणे जिल्ह्यात वापर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. सुधारित आदेशाप्रमाणे 16 व 17 ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. 

यासंदर्भात अतिरिक्त दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात एकसूत्रीपणा व एकच कालमर्यादा असण्याच्या दृष्टीने 16 ऑक्टोबर सप्तमी व 17 ऑक्टोबर अष्टमी असे दोन दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा विहित मर्यादेत वापर करण्यास अनुमती दिली आहे.

नवरात्रोत्सवात 17 तारखेस अष्टमी आणि 18 तारखेस म्हणजे नवमीच्या दिवशी दसरा आला आहे. यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकासाठी नेमक्या कोणत्या दिवशी परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल मागविला होता.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने 17 आणि 18 ऑक्टोबर असे दोन दिवस तर ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे ग्रामीण पोलीस यांनी 16 आणि 17 ऑक्टोबर अशा तारखांची शिफारस केली होती. त्यामुळे आदेशांत एकसूत्रीपणा असावा म्हणून पूर्वीच्या आदेशांत अंशत: बदल करून 16 ऑक्टोबर व 17 ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला. हा आदेश संपूर्ण जिल्ह्याला लागू असेल.

टॅग्स :Navratriनवरात्रीpollutionप्रदूषणNavi Mumbaiनवी मुंबई