शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

स्थायी समिती मार्ग अखेर होणार मोकळा; कोकण आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:22 IST

कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधीतज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे : शिवसेनेने चुकीच्या पद्धतीने स्थायी समिती सदस्यांची निवड केल्याने स्थायी समितीचा मार्ग खडतर झाला होता. परंतु, आता स्थायी समिती गठीत करण्याबरोबरच सभापतीनिवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधीतज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्याचाच आधार घेऊन आता स्थायी समितीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.यानुसार, आता या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना दिल्याचीही माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यांनी निवडणूक कार्यक्र म जाहीर केल्यानंतर पुढील प्रक्रि या पालिका प्रशासनाकडून पार पाडली जाणार आहे. सुरुवातीपासूनच संख्याबळावरून स्थायी समिती गठीत करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, असे असतानाही पूर्वीचीच परंपरा कायम राखून शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी स्थायी समिती सदस्यांची निवड केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपने एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतर स्थायी समितीवर युतीची सत्ता सहज प्रस्थापित होऊ शकते. मात्र, त्याचा मोबदला भाजपला द्यावा लागू नये, यासाठी शिवसेनेने २०१८ साली केलेल्या खेळीची पुनरावृत्ती केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांचे संख्याबळाचे आदेश धुडकावून काँग्रेसचा गट सेनेसोबतच असल्याचा दावा करून सेनेने आपल्या कोट्यातून काँग्रेसच्या यासीन कुरेशी यांच्यासह नऊ जणांची निवड केली आहे. ही निवड प्रक्रि या बेकायदा असल्याचे सांगून राष्ट्रवादीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला होता. मात्र, अद्याप तशा कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत.भूमिकेकडे लक्ष- कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाचे पालन न झाल्याने स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक घेता येईल का, याबाबत प्रशासनाने कायदेशीर सल्ला वरिष्ठ विधीतज्ज्ञांकडून मागवला होता.निवडप्रक्रि येपेक्षा त्यांनी स्थायी समितीच्या कामकाजाला जास्त महत्त्व असल्याचा अभिप्राय नोंदवून या निवडीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आता स्थायी समितीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सभापतीपदाची निवड होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही निवडणूक घेण्यापूर्वी कोकण विभागीय आयुक्तांचा अभिप्राय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. त्या अभिप्रायावर निवडणुकीचा निर्णय अपेक्षित असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका