दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:42 AM2021-07-30T04:42:26+5:302021-07-30T04:42:26+5:30

----------------------------------- दोन दुकानांमध्ये चोरी कल्याण : पश्चिमेतील मोहने बाजारपेठ परिसरातील रंजना अगरबत्ती आणि पारस नॉव्हेल्टी या दुकानांचे शटर उचकटून ...

Pedestrian injured in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

Next

-----------------------------------

दोन दुकानांमध्ये चोरी

कल्याण : पश्चिमेतील मोहने बाजारपेठ परिसरातील रंजना अगरबत्ती आणि पारस नॉव्हेल्टी या दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानांमधील रोकड आणि माल असा नऊ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------

सोनसाखळी लंपास

कल्याण : पश्चिमेतील योगीधाम परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे या आयुक्त बंगल्याच्या पाठीमागे, ओम सनराईज बिल्डिंगच्या समोरील रस्त्यावरून बुधवारी सायंकाळी चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------------------------

कोरोनाचे नवे ६३ रुग्ण

कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनाचे नवीन ७१ रुग्ण आढळून आले; तर उपचाराअंती ४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सध्या ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीत एक लाख ३९ हजार ६६ रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३५ हजार ५९२ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

----------

Web Title: Pedestrian injured in two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app