शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

‘झेप’मुळे मिळाले रुग्णांना प्लाझ्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 11:39 PM

सोशल मीडियाचा प्रभावी वापर : संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

ठाणे : ठाणे शहरातील झेप प्रतिष्ठानमुळे हरयाणातील दोन रुग्णांना प्लाझ्मा मिळाला. याआधी संस्थने दिल्लीतील रुग्णालाही प्लाझ्मादाते मिळवून दिले होते. झेप प्रतिष्ठानने गेल्या काही दिवसांत कोविडच्या कठीण काळात लोकांना प्लाझ्मादान करण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून लोकांना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान करून जवळपास ११४ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. झेप प्रतिष्ठानची ही घोडदौड ठाणे मुंबईतच नाही तर पुणे, नगर ते थेट हरियाणापर्यंत पोहोचली. तेथील कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची मदत करण्यात आली. फरिदाबाद येथील मोहित शर्मा आणि गुरगाव येथील सचिन अरोरा या रुग्णांसाठी सोशल मीडियावर प्लाझ्मासाठी आवाहन झाल्यावर प्रतिष्ठानने हरियाणामध्ये त्यांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. सोशल मीडियाचा अचूक वापर करून दोन पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी केल्यामुळे झेप प्रतिष्ठानचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर गेल्या १५ दिवसांत तब्बल ७४ जणांना प्लाझ्मा, २४ बेड, १७ इंजेक्शन तसेच दोन रक्तदाते दिले आहेत. कोरोनातून बरे झालेले रुग्ण काही बाबींच्या पूर्तता केल्यावर किमान दोन लोकांचे प्राण वाचवू शकतात. त्यामुळे या जीवघेण्या संकटातून बरे झालेल्या लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मादान करून लोकांचे प्राण वाचवावे, असे आवाहन झेप प्रतिष्ठानने केले आहे. अवघ्या तीन तासांत झेप प्रतिष्ठाने हरयाणा येथील त्या कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची मदत मिळवून दिली. एकाला २ मे तर दुसऱ्याला ४ मे रोजी प्लाझ्मा मिळवून देण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या