भिवंडीत योग्य उपचार न केल्याच्या रागातून रुग्णाचा डॉक्टरवर हल्ला
By नितीन पंडित | Updated: March 28, 2023 18:08 IST2023-03-28T18:08:01+5:302023-03-28T18:08:09+5:30
डॉक्टर कपील अहमद झहीरुद्दीन फारुखी वय ६७ वर्ष यांचा वंजारपट्टी परिसरात दवाखाना आहे.

भिवंडीत योग्य उपचार न केल्याच्या रागातून रुग्णाचा डॉक्टरवर हल्ला
भिवंडी -रुग्णावर योग्य उपचार न केल्याने डॉक्टर वर प्राणघातक हल्ला करण्याची घटना भिवंडी शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात डॉक्टर च्या डोक्यास दुखापत झाली आहे.
डॉक्टर कपील अहमद झहीरुद्दीन फारुखी वय ६७ वर्ष यांचा वंजारपट्टी परिसरात दवाखाना आहे. या ठिकाणी उपचारासाठी आलेले अताउल्लाह सुकरुल्लाह अन्सारी वय ५५ वर्ष हे आले होते.त्यांच्यावर डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा राग मनात ठेवला होता. त्यातच रमजान महिन्यात सकाळी लवकर नमाजसाठी घराबाहेर पडलेले डॉ. कपील अहमद झहीरुद्दीन फारुखी हे नमाज पठण करून वंजारपट्टी नाका येथील बहार ए मदीना मस्जीदच्या बाहेर पडून घरी जाण्यासाठी आपल्या कार जवळ जात असताना त्याठिकाणी पाळतीवर असलेल्या अताउल्लाह सुकरुल्लाह अन्सारी याने आपल्या जवळील हतोड्याने डॉक्टरच्या डोक्याला, कानाच्या वर जोरात मारुन दुखापत केली आहे.
या घटने नंतर डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारी वरून निजामपुरा पोलीसांनी अताउल्लाह सुकरुल्लाह अन्सारी यास अटक केली आहे .या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.डी.पवार हे करीत आहेत.