शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार, अवघी 100 रुपये फी, फक्त 15 ते 20 विद्यार्थी, सुविधांचा अभाव, मनसेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:44 PM

परप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार मांडल्याचा आरोप मनसेने केला आहे.

ठळक मुद्देपरप्रांतीय शिक्षण संस्थेने ठाण्यात मांडलाय शिक्षणाचा बाजार - मनसेअवघी 100 रुपये फी, फक्त 15 ते 20 विद्यार्थी सखोल चौकशीची मागणी

ठाणे : घोडबंदर रोड आनंद नगर येथील एस.जी. इंग्लिश स्कूलचे प्रकरण मनसेने उघडकीस आणल्यानंतर त्याच संस्थेने अजून एका ठिकाणी सुरु केलेल्या शाळेचा भांडाफोड मनसेने केला आहे. शालेय फी अवघी 100 रुपये, 15 ते 20 विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळा की कोंडवाडा अशी परिस्थिती असलेल्या मानपाडा येथील कृष्णा नगर येथे ही शाळा सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी ठाणे मनपा शिक्षणाधिकाऱयांकडे याबाबत लेखी तक्रार केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देताना प्रमोद पत्ताडे यांच्यासमवेत मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, ठाणे शहर सचिव सचिन सरोदे व अरविंद बाचकर, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव व विजय रोकडे, विभाग अध्यक्ष विजय दिघे, उपविभाग अध्यक्ष हेमंत मोरे, प्रभाग अध्यक्ष प्र.क्र. 4 लहू दळवी, शाखा अध्यक्ष क्र. 4 संदीप गोंदुकुपे, विभाग अध्यक्ष ऋषिकेश चौधरी, उपविभाग अध्यक्ष हर्षद काहंडोळे, विभाग अध्यक्ष गौरव भोईर, शाखाध्यक्ष अक्षय चौधरी आदींचा समावेश होता. ठाणे शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. याचाच फायदा घेऊन काही परप्रांतीय शिक्षण संस्था शिक्षणाचा बाजार चालवत आहेत, अशी बाब नजरेस येत असून सर्व काही सेटींगवरती चालत असून `तुम्ही खा, आम्हाला पण खाऊ द्या' असे या शाळांची परिस्थिती पाहून म्हणावेसे वाटते असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. टिकुजिनी वाडी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कृष्णानगर येथे सदर शाळा सुरू असून या शाळेमध्ये पदवी नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. शाळेची अवस्था अतिशय भयावह आहे. अस्वच्छ वर्ग, शौचालय आढळून आले नाही, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी पोषक असे वातावरण नाही आणि अत्याधुनिक सोयीसुविधाही नाहीत. या शाळेत फक्त 15 ते 20 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेची प्रवेश फी फक्त 100 रुपये महिना आणि वार्षिक फी फक्त 150 रुपये आहे. तेथील गरजू विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. ही शाळा तीन वर्षांपासून येथे या अवस्थेत सुरू असून या अगोदर अनधिकृत बांधकाम म्हणून ठाणे महापालिकेने या शाळेवर कारवाई केली होती. तरी सुद्धा गेल्या तीन वर्षांपासून या अवस्थेत ही शाळा सुरू असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. जर या शाळा अशाप्रकारे चालत असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. अशा शाळा स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित होतात तरी कशा? यांना मान्यता मिळते तरी कशी? असे सवाल या निवेदनात उपस्थित करून या संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत तेथील सर्व शिक्षकांची बिंदु नामावली मार्पत (रोस्टर) चौकशी व्हावी, अशाप्रकारच्या निकृष्ट दर्जाचे शिक्षण देणाऱया सदर संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच या शाळांना मान्यता कशी दिले जाते याची सखोल चौकशी करण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱया अशा संस्थांची दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनात करून योग्य ती कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी निवेदनात दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेEducationशिक्षण