शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

पत्रीपुलावर शिवसैनिकांची स्टंटबाजी, वाहतूक सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:14 IST

वाहतूक सुरू करण्याची मागणी : पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न, पालकमंत्र्यांच्या फोनमुळे नरमाईची भूमिका

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल धोकादायक बनल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने शिवसैनिकांनी स्टंटबाजी करत शनिवारी दुपारी हा पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून लेखी आदेश येत नाहीत, तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे सांगत पोलिसांनी पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, पूल २५ सप्टेंबरपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला राहील, असे रेल्वेने प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.

जुना पत्रीपूल पाडण्याचे काम शनिवारपासून हाती घेतले जाईल, असे रेल्वेने बुधवारी जाहीर केले होते. त्यानुसार, पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. परंतु, पुलाच्या परिसरात होणाºया कोंडीमुळे जुन्या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश जाधव, जयवंत भोईर, नगरसेविका रेखा जाधव, माजी नगरसेवक कैलास शिंदे, सचिन बासरे, आशा रसाळ यांनी केली. त्यावर, पुलावरून कोणत्याही परिस्थितीत वाहतूक सुरू करता येणार नाही. शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे पोलिसांनी त्यांना बजावले. पुलावरून वाहतूक सुरू करण्याबाबत रेल्वेकडून आदेश मिळालेले नाहीत. रेल्वे अधिकारी व पालकमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. त्यातील निर्णयानुसार अमल करू, असे पोलिसांनी शिवसैनिकांना सांगितले. यावेळी एका पोलीस अधिकाºयाने पालकमंत्री शिंदे यांना फोन लावून शिवसैनिकांचे बोलणे करून दिले. शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी शांततेचा पवित्रा घेतला.भोपाळच्या एजन्सीने पुलाची पाहणी केली होती, तेव्हा आणखीन काही वर्षे पुलाचा वापर करता येईल, असे स्पष्ट केले होते, याकडे शिवसैनिकांनी लक्ष वेधले. रविवारी रक्षाबंधन असल्याने दोन दिवस पूल हलक्या वाहतुकीसाठी खुला करावा, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. तब्बल तीन तास हा प्रकार सुरू होता. शिवसैनिक पुलाचे बॅरिकेड तोडून वाहतूक सुरू करण्याच्या बेतात होते. त्यामुळे पोलीस फौजफाटा तैनात होता.पत्रीपूल पाडण्यासाठी घ्यावा लागणार जम्बोब्लॉक, यंत्रणांपुढे आव्हानजुना पत्रीपूल लवकरात लवकर पाडण्यासाठी रेल्वेकडून दबाव आणला जात आहे. शनिवारपासून हा पूल पाडण्याची घोषणा करण्यात आली होती. पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यानंतर त्यावरील पथदिवे, दूरध्वनी, वीजवाहिन्या आदी काढण्यास सुरुवातही झाली आहे. परंतु, हा पूल पाडण्यासाठी रेल्वेला मोठा जम्बोब्लॉक घ्यावा लागणार आहे.कल्याण हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन आहे. या स्थानकातून कर्जत, कसारामार्गे लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या जातात. मालगाड्यांचे मोठे यार्ड येथे आहे. या सर्वच गाड्यांची वाहतूक कल्याणहून दिवसरात्र सुरू असते. त्यामुळे पुलाच्या पाडकामासाठी जम्बोब्लॉक घेताना रेल्वेला या गाड्या अन्य मार्गांनी वळवाव्या लागतील किंवा त्यांच्या फेºया रद्द कराव्या लागतील. रेल्वे प्रशासनासाठी ते मोठे आव्हान असणार आहे.

सध्या मुंब्रा बायपास बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-शीळ या मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कोंडी होत आहे. गणेशोत्सवही तोंडावर आला आहे. या बाबी विचारात घेतल्यास सध्या पत्रीपूल पाडणे यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर पाडकाम हाती घेणे योग्य ठरणार आहे.

जुना पूल पाडताना नवीन पुलावरील वाहतूकही काही वेळ बंद ठेवावी लागू शकते. त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. त्याचबरोबर राज्य रस्ते विकास महामंडळ, केडीएमसी, पोलीस, वाहतूक पोलीस याचबरोबर अन्य यंत्रणांनाही रेल्वेला सोबत घेऊन नियोजन करावे लागणार आहे.मुंब्रा बायपास सुरू झाल्यावर दिलासा?डोंबिवली : जुना पत्रीपूल वाहतुकीस बंद केल्याने कल्याण शहरात तसेच कल्याण-शीळ या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. वाहतूक नियोजन व त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शनिवारी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.यावेळी शहरातील गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी, बाईचा पुतळा, वालधुनी, आग्रा रोड, सहजानंद चौक, शिवाजी चौक, महापालिका परिसर तसेच वायलेनगर, गांधारी आदी भागांमध्ये वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. सण-उत्सवाच्या कालावधीत कोणाचीही गैरसोय होऊ नये, यादृष्टीने काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली.१० सप्टेंबरनंतर मुंब्रा बायपास सुरू झाल्यावर सध्या पडणारा ताण काहीसा हलका होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त एस. गोसावी, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर तसेच विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना