दिवगंत अभिनेत्री नुतन यांच्या मुंबईतील बंगल्याचा काही भाग कोसळला
By कुमार बडदे | Updated: June 27, 2023 21:15 IST2023-06-27T21:13:39+5:302023-06-27T21:15:02+5:30
या बंगल्याच्या जीर्ण झालेल्या सज्जाचा मोठा भाग पडल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली

दिवगंत अभिनेत्री नुतन यांच्या मुंबईतील बंगल्याचा काही भाग कोसळला
कुमार बडदे, मुंब्रा
मुंब्रा - दिवगंत सिने अभिनेत्री नुतन बहल यांच्या बंगल्याचा काही भाग मंगळवारी संध्याकाळी पडला. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील पारसिक बोगद्याच्या वर (रेतीबंदर सर्कल जवळ) असलेला हा बंगला पुरातन असून,सिने रसिकांच्या तसेच सर्वसामान्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा बंगला सध्या पडीक आहे.
या बंगल्याच्या जीर्ण झालेल्या सज्जाचा मोठा भाग पडल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच जवाहरबाग अग्निशमन केंद्राचे जवान एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहचले. बंगला आणि पडलेल्या भागाची पहाणी करुन पुढील कार्यवाही करण्या बाबत कळवा येथील सार्वजनिक बाधकाम विभागाला कळवण्यात आले आहे. सज्जाचा भाग पडला त्यावेळी तेथे कुणीही नव्हते.यामुळे सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.