भिवंडीत आजमी नगर येथे इमारतीचा काही भाग कोसळला, सुदैवाने टळली जीवितहानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 20:07 IST2021-09-18T19:58:39+5:302021-09-18T20:07:48+5:30
Bhiwandi News : पहिल्या मजल्यावर कुटुंबीय अडकून पडले होते तात्काळ स्थानिक युवकांनी तीन पुरुष दोन महिला व दोन मुले अशा एकूण सात जणांना रेस्क्यू करण्यात आले.

भिवंडीत आजमी नगर येथे इमारतीचा काही भाग कोसळला, सुदैवाने टळली जीवितहानी
भिवंडी (दि. १८) - भिवंडी शहरातील दिवान शहा दर्गा परिसरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक या भागात ३ सप्टेंबर रोजी एक मजली घराचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरात शनिवारी एक मजली घराचा काही भाग कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावर कुटुंबीय अडकून पडले होते तात्काळ स्थानिक युवकांनी तीन पुरुष, दोन महिला व दोन मुले अशा एकूण सात जणांना रेस्क्यू करण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती अजून ही अग्निशामक दल, पालिका आपत्ती व्यवस्थापन व पोलीस यांना या घटनेची माहिती मिळाली नव्हती हे विशेष. याबाबत महापालिका सुत्रांकडे विचारणा केली असता सदरच्या घराची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असताना सज्जाचा काही भाग कोसळला असल्याची माहिती दिली आहे.