शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गावदेवी मैदानाखाली होणार पार्किंग प्लाझा

By admin | Updated: August 14, 2015 23:44 IST

ठाणे महापालिकेने एकीकडे पार्किंग धोरण राबविण्यास सुरुवात केली असताना आता शहरातील आरक्षित भूखंडावर पार्किंग सेंटर सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने एकीकडे पार्किंग धोरण राबविण्यास सुरुवात केली असताना आता शहरातील आरक्षित भूखंडावर पार्किंग सेंटर सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. तसेच आता स्टेशन परिसरात असलेल्या गावदेवी मैदानाखाली पार्किंग प्लाझा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, अखेर यासंदर्भातील प्रस्ताव २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे रेल्वे स्थानकात रोज सुमारे सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करीत असतात. पैकी, बहुसंख्य प्रवासी हे स्वत:च्या मालकीच्या वाहनांचा वापर करीत असून स्थानक परिसरात वाहन पार्किंग करतात. तसेच रेल्वे स्थानक परिसरास लागून असलेली बाजारपेठ पाहता परिसरात सतत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी पुरेशा पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची पार्किंग होत असते. त्यामुळे या भागात वाहतूककोंडीही होत आहे. त्यामुळेच यावर पर्याय म्हणून पालिकेने तीन वर्षांपूर्वी गावदेवी मैदानाखाली पार्किंग प्लाझा उभारण्याचा विचार सुरू केला होता. मात्र, प्रत्यक्षात मुहूर्त सापडला नव्हता. परंतु, आता या भागात होणारी वाहतूककोंडी पाहता पालिकेने पुन्हा हा प्रस्ताव पटलावर आणला आहे. गावदेवी मैदानाच्या सुमारे ७७५० चौ.मी. क्षेत्रफळापैकी सुमारे ५६५२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भागात तळघरात वाहनतळ विकसित करण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सुमारे १५० चारचाकी हलकी वाहने आणि १४० दुचाकी वाहने एकाच वेळी पार्क करता येऊ शकणार आहेत. या वाहनतळाची भविष्यात क्षमता वाढविता येईल, अशा प्रकारचेही नियोजित बांधकाम करण्यात येणार आहे. या वाहनतळात अद्ययावत सोयीसुविधांयुक्त पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीमबरोबरच अग्निशमन यंत्रणा तसेच सुरक्षेविषयी यंत्रणा (सीसीटीव्ही कॅमेरे) बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी २७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे. यामध्ये स्थापत्य कामाकरिता येणाऱ्या खर्चासह तज्ज्ञ सल्लागार फी, पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा तसेच सुरक्षेविषयी यंत्रणेचा समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)