आदिवासी गुराख्याला पाजले विष, एकाच गावातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:16 IST2017-10-12T02:16:04+5:302017-10-12T02:16:18+5:30

आदिवासी गुराख्याला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळील राहटोळी गावात घडला आहे. याआधीही याच गावात एका शेतक-याला कीटकनाशक पाजल्याची घटना घडली होती.

 Panzed poison of tribal gurakhas, second incident of same village | आदिवासी गुराख्याला पाजले विष, एकाच गावातील दुसरी घटना

आदिवासी गुराख्याला पाजले विष, एकाच गावातील दुसरी घटना

बदलापूर : आदिवासी गुराख्याला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळील राहटोळी गावात घडला आहे. याआधीही याच गावात एका शेतक-याला कीटकनाशक पाजल्याची घटना घडली होती.
हरिश्चंद्र वाघे असे गुराख्याचे नाव आहे. त्याचा विष पाजल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. सकाळी हरिश्चंद्र रानात म्हशी चरायला घेऊन गेला असता त्याला पाच ते सहा जणांनी विष पाजले, असा आरोप नातेवाइकांनी केला. वाघे याला लगेच उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सहा दिवसांपूर्वी याच गावात शेतकºयाला विष पाजल्याने दत्तू बनकर या शेतकºयाचा मृत्यू झाला. वाघे हा मृत शेतकरी बनकर यांच्या भावाचा गुराखी म्हणून काम पाहत होता.
एका आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थ मात्र भीतीच्या छायेत आहेत. याप्रकरणी वाघे याच्या नातेवाइकांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. एकाच आठवड्यात दोन घटना एकाच गावात घडल्याने या प्रकरणांचा तपास करणे पोलिसांना अवघड जात आहे.

Web Title:  Panzed poison of tribal gurakhas, second incident of same village