शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

पंडित जोशी रुग्णालयात बाळंतिणी, बाळांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:59 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बाळंतिणी व नवजात बाळांसाठी गरम पाणी मिळत नसल्याने त्यांना चक्क चारचार दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बाळंतिणी व नवजात बाळांसाठी गरम पाणी मिळत नसल्याने त्यांना चक्क चारचार दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे. शिवाय, अस्वच्छ स्वच्छतागृह, आवश्यक औषधे न देणे आदी अनेक भोंगळ प्रकारही समोर आले आहेत. एकूणच पालिका रुग्णालयात बाळंतिणी व त्यांच्या नवजात बाळांचेही हाल होत आहेत.महापालिकेचे भार्इंदर येथील जोशी रुग्णालय नेहमीच वाद आणि टीकेमुळे वादग्रस्त राहिले आहे. रुग्णालयाची इमारत बांधली असली, तरी आजही पालिकेने आयसीयू, बालकांसाठीचे एनआयसीयू, शस्त्रक्रियागृहासारख्या आवश्यक सुविधाच अजून उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. आवश्यक डॉक्टर तसेच यंत्रसामग्री, कर्मचारीवर्ग व औषधे आदींचा थांगपत्ता नसताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र दालनांपासून विविध कार्यक्रम, अनावश्यक कामे यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करत आले आहेत. यातून अनेकांचे बळी गेले असून अनेकांना उपचाराअभावी जाचाला सामोरे जावे लागले आहे. पालिकेच्या या निगरगट्ट कारभाराची दखल राष्ट्रीय व राज्य बालहक्क संरक्षण आयोगासह राज्य मानवी हक्क आयोगानेही घेतली आहे. सरकारनेही पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णालय ताब्यात घेऊन चालवण्यास नकार दिला आहे.पालिका रुग्णालयाची रुग्ण व नातलगांसाठी छळछावणी झाल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत असताना पालिका रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल महिला व नवजात बाळांना अनेक यातनांना सामोरे जावे लागत आहे. प्रसूतिगृहातील गिझर खराब झाल्याचे कारण सांगून बाळंतिणींना अंघोळीसाठी गरम पाणीच दिले जात नाही. थंड पाणीच उपलब्ध असल्याने बाळंतिणींना नाइलाजाने अंघोळ न करताच चारचार दिवस काढावे लागत आहेत.थंड पाण्याने अंघोळ करायची म्हटल्यास सर्दीतापाची लागण होऊन त्याची बाधा नवजात बाळाला होण्याची भीती असते. बाळंतिणीला गरम पाणी नसल्याने अंघोळ करणे शक्य होत नसल्याने घामामुळे इन्फेक्शन होण्याचीही धास्ती असते. नवजात बाळालाही गरम पाणी नसल्याने अंग पुसून घेतले जात नाही.प्रसूतिगृहात तीन शौचकूप असून तीही अस्वच्छ आहेत. दुर्गंधी पसरलेली असते. अंघोळीसाठी एकच न्हाणीची खोली असून तीही गैरसोयीची आहे. याची दारेही जुनी लावली असल्याने खराब झाली आहेत. बाळंतिणींना स्वच्छतागृहात जाण्यासाठी परिचारिका व कर्मचाऱ्यांकडून स्लीपर घालण्यास मनाई केली जाते. उघड्या पायाने गार पाण्यात जाण्यामुळेही तब्येत बिघडण्याची भीती असते. कर्मचारी मात्र स्लीपर घालून वावरत असतात.नवजात बाळाच्या नाभीला लावण्यासाठीची पावडर, क्रीम आदी असूनही कर्मचाऱ्यांकडून दिले जात नाही. त्यामुळे बाळ व आईसाठी ठेवल्या जाणाºया पावडर आदी औषधांचा गैरप्रकार होत असल्याची शक्यता बळावली आहे. अंघोळीसाठी गरम पाणी नाहीच, पण पिण्यासाठीही बाळ व बाळंतिणीस गरम पाण्याची सुविधा नाही. पालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत तात्काळ गरम पाण्यासाठी गिझर बसवण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना करणार आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या सुविधा रूग्णालयात पुरवण्याचे निर्देशेही दिले जातील.- बालाजी खतगावकर, आयुक्तअंघोळीला व पिण्यास गरम पाणी नाही. त्यामुळे बाळ व बाळंतिणीला चार दिवस अंघोळीशिवाय राहावे लागले. स्वच्छतागृह अस्वच्छ असून बाळंतिणीस स्लीपरही घालू देत नाहीत. बाळंतीण व बाळाला लावण्यासाठी पावडर-क्रीम असूनही दिले जात नाही. कर्मचाºयांना काही सांगितले तर तक्रार करा, असे सरळ सांगतात. गोरगरिबांना वागणूक चांगली दिली जात नाही.- माला पटेल, बाळंतिणीची आई

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMira Bhayanderमीरा-भाईंदर