पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 01:16 AM2020-07-31T01:16:45+5:302020-07-31T01:17:03+5:30

तिघांचा मृत्यू : १९१ पोलिसांना लागण, १५१ जणांची कोरोनावर मात

Palghar district police force corona | पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलाला कोरोनाचा विळखा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोनाने वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातही थैमान घातले आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून तिन्ही पोलीस वालीव पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सद्यस्थितीत पालघर जिल्हा पोलीस दलातील १९१ पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून १५१ पोलीस कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. यातील बरे झालेले पोलीस पुन्हा कर्तव्यावरही हजर झाले आहेत.
पालघरमधील वसई तालुक्यात दररोज शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित रु ग्ण सापडत आहेत. यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वेळोवेळी नागरिकांना केले जात आहे. वसई, विरार व पालघर जिल्ह्यामध्ये ८ जूनपासून टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी कोरोनाचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मृतांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झाली असून रोज कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचे जादा प्रमाण हीच एकमेव या काळात समाधानाची बाब ठरली आहे.


दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. कामधंदे ठप्प झाले आहेत. अर्थव्यवस्थेचे चाक चिखलात रुतले आहे. हे संकट असताना अद्याप वसई, विरार व एकूणच पालघर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस दलातील कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.


पालघर पोलीस दलालाही त्याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ज्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, ते तिघेही वालीव पोलीस ठाण्याचे कर्मचारी होते. पोलीस हवालदार किरण साळुंखे, पोलीस नाईक जितेंद्र भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचा यात मृत्यू झाला. आतापर्यंत १५१ पोलीस कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ३७ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपचार घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पालघर जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोना होत आहे, ही बाब चिंताजनक आहे.

वालीव पोलीस ठाण्यात आज तपासणी
वालीव पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने सर्वत्र याच पोलीस ठाण्याची चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वालीव पोलीस ठाण्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे वसई-विरार महानगरपालिका आरोग्य विभागातील डॉक्टरांचे एक पथक शुक्रवारी सकाळपासून पोलीस ठाण्यातील कार्यरत १२५ ते १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची रॅपिड तपासणी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.

Web Title: Palghar district police force corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.