नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात सखींनी चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते, लोकमत सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावणसोहळ्याचे. ...
भाजपाने यंदाच्या पालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासाठी (आठवले गट) सोडलेल्या जागांवरील उमेदवारांसाठी भाजपाचे कमळ चिन्ह निश्चित केले आहे. त्यामुळे रिपाइंच्या त्या उमेदवारांबाबत स्वपक्षातच संभ्रम निर्माण झाल्याने पक्षाने प्रभाग-१ मधून दोन उमेदवार अपक्ष म ...
इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयातील शवागृहातील दुरवस्थेबाबत गुरूवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशसानाला खडबडून जाग आली. या संदर्भात महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत याबाबत सरकारकडून कारवाई करण्यासाठी ...
बदलापूरमधील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कबड्डीपटूच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या एका सेवाभावी संस्थेने घेतली आहे. युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता. ...
गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते ...
वाहतुकीला अडथळा ठरत असलेले पश्चिमेतील रेल्वेस्थानकासमोरील पदपथावरील ३६ वर्षांचे जुने गणपती मंदिर गुरुवारी केडीएमसीने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. रस्त्याच्या एका आडोशाला असलेल्या या मंदिरावर कारवाई झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
पश्चिमेला रेल्वेस्थानक परिसरात बसस्टॉपसमोर भररस्त्यात रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. वशिष्ठ भालेराव (रा. मोहने) व राजेश दुबे (रा. आंबिवली) अशी या बेशिस्त रिक्षाचालक ...
नगरसेवक विक्रांत चव्हाण हे त्यांच्या हस्तकामार्फत खंडणीसाठी आपल्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करून एका कुटुंबाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे बुधवारी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र दिले. ...
मुरबाडमधील आदिवासींची जमीन नावावर करून देतो, अशी बतावणी करून ठाण्यातील दोन ज्येष्ठ डॉक्टरांना सुमारे १४ लाखांचा गंडा घालणा-या दीपक बर्गे याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री कोल्हापुरातून अटक केली. ...