शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

इतिहासाचा जाणकार हरपला; पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:17 AM

वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ठाणे: भारतीय इतिहासाची जपणूक करण्यात आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) सहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालय शास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरूखमध्ये लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय साकारलं गेलं. या ठिकाणी इंग्रजांच्या काळातील बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत. गोरक्षकर यांनी व्यापक लिखाण केलं. राजभवन्स इन महाराष्ट्र, अ‍ॅनिमल्स इन इंडियन आर्ट, द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. पश्चिम भारतातील गुप्तकालीन शिल्पकलेवरही त्यांनी लेखन केलं. या कार्याबद्दल 2003 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.