शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus in Thane: ठाण्यात धावपळ! महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपला; रुग्णांना हलविण्याचे काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 7:56 PM

Oxygen stock in Thane: ऑक्सीजन आणि आयसीयुमधील २६ रुग्णांना तत्काळ गोल्बल रुग्णालयात हलविण्यास सुरवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यात लसींचा आणि रेमडीसीव्हर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतांना आता महापालिकेच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या ज्युपीटर रुग्णालया शेजारी असलेल्या पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील ऑक्सीजन आणि आयसीयुमध्ये असलेल्या २६ रुग्णांना तत्काळ हलविण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयाबाहेर एकाच वेळेस २० ते २५ रुग्णवाहीका लागल्याचे दिसत आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक मात्र भयभीत झाल्याचे दिसून आले.

ठाणे  शहरात रोजच्या रोज १५०० ते १८०० रुग्ण नव्याने वाढत आहेत. त्यात या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीव्हरचे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मागील काही दिवसापासून धावपळ सुरु आहे. दुसरीकडे लसीकरण देखील शहरात थांबले आहे. अशातच आता महापालिकेच्या पार्कीग प्लाझाच्या कोवीड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सेंटरमध्ये अवघे दोन बाटले शिल्लक असल्याची माहिती पुढे आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. शनिवारी संध्याकाळी या रुग्णालयासाठी ऑक्सीजनचा साठा उपलब्ध होणार होता. मात्र तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. तसेच जो साठा येणार आहे. तो केवळ ८ ते १० टनार्पयत रविवारी सकाळी किंवा दुपार र्पयत येणार आहे. परंतु तो देखील अपुरा पडणार असल्याने, आधीच दक्षता म्हणून रुग्णांना हलविण्याचे काम सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.

परंतु येथे काम करणा:या एका कर्मचा:याच्या म्हणन्यानुसार येथील ऑक्सीजनचा साठा संपला असून केवळ दोनच बाटले शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधून रुग्ण हलवावे लागतील असे सांगितल्यानंतर प्रशासनाने ही पावले उचलली असल्याचे सांगितले. हे रुग्णालय जवळ जवळ १ हजार बेडचे आहे. मागील दोन आठवडय़ापूर्वीच हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी सध्याच्या घडीला ५५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर ११ आयसीयु, आणि ऑक्सीजनवर १६ असे मिळून २६ रुग्ण येथे ऑक्सीजनवर असून त्यांना शनिवारी सांयकाळी हलविण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यामुळे येथे २० ते २५ रुग्णवाहीका एका मागोमाग एक उभ्या झाल्या होत्या. त्यानंतर एक एक करुन रुग्णांना हलविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु रुग्णांच्या नातेवाईंकाच्या चेह:यावरील चिंता मात्र अधिक वाढल्याचे दिसत होते. रुग्णालयाबाहेर रुग्णांचे नातेवाईक हिरमुसल्या सारखे बसून होते. प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईंका केला आहे. कोरोनामध्ये लंग्जला इनफेक्शन त्रस होत असतो, परंतु असे असतांना येथील रुग्णालयात सुविधा नाहीत, रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या औषधे वेळेत दिले जात नसल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांना केला आहे. ज्या कंपन्याकडून ऑक्सीजनचा साठा घेतला जातो, त्यांच्याकडून प्रोडक्शन कमी निघाल्याने हा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु रात्री २ ते ३ टन साठा मिळणार असून रविवारी सकाळ किंवा दुपार र्पयत ८ ते १० टन साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चिंता असणार नाही. परंतु ऑक्सीजनचा साठा संपला नसून सध्या रात्रभर पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. परंतु सकाळ साठा उपलब्ध झाला नाही तर रुग्णांचे हाल नको या उद्देशानेच येथील रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले.(गणेश देशमुख - अतिरीक्त आयुक्त, ठामपा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस