शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

घरहक्क परिषद : मालकी हक्काचीच घरे क्लस्टरमध्ये मिळाली पाहिजेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:35 AM

निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण, ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते.

ठाणे : निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण, ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते. एफएसआय व टीडीआरची माहिती दिली पाहिजे. सरकारी जमीन फ्री होल्ड देता येत नाही. क्लस्टरमध्ये जमिनींची मालकी सगळ्यांच्या नावावर नाही. त्यामुळे क्लस्टरमध्ये मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी केली.ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने रविवारी वागळे इस्टेट भागात घरहक्क परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच ही चळवळ आपण चालविली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानुसार, जे १० ठराव करण्यात आले आहेत, ते योग्य असून त्याचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिका हद्दीत क्लस्टर योजना राबवली जात असून त्यामध्ये कशा पद्धतीने धूळफेक केली जात आहे, त्याअनुषंगाने ठाणेकरांना ही योजना काय आहे, त्यासाठी या परिषदेचे आयोजन केले होते. बिल्डर इमारत बांधत नाही, तर विविध कंत्राटदार इमारत बांधतात. जो कंत्राटदार बिल्डरची इमारत बांधतो, तो आपल्यासाठीही इमारत बांधेल. याची तयारी जनतेने करावी, पैसे आपणच देतो, तेव्हा बिल्डर घर बांधतो, पण पैसे द्यायला बँका तयार आहेत. सर्व परवानग्या त्याला आपोआपच मिळतात, हे खरे नाही. त्याकरिता एक एजन्सी असते. ते ती काम करते. आपण त्या लवकर आणू शकतो. जे बिल्डर देतो, ते आपणही करू शकतो, हे लक्षात घ्या म्हणून स्वयंविकास हेच धोरण योग्य आहे. ते आपण करा, म्हणजे आपणास ३२३ काय ६०० फुटांचे घर मिळू शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.अ‍ॅड. सुनील दिघे यांनी विविध कायदेविषयक अनेक तरतुदी व धोक्याचे इशारे काय आहेत, हे समजावून सांगितले. बदलत्या काळात आपण जागरूक राहावे, संघटित राहावे, असेही त्यांनी सांगितले. परिषदेचे अध्यक्ष उन्मेष बागवे यांनी नागरिकांच्या नव्या संघर्षाची ही सुरुवात असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना सर्व ठराव मंजूर करून घेतले. त्या अनुषगांने हे ठराव आता मुख्यमंत्र्यांपासून ठाण्यातील सर्व आमदारांना दिले जाणार असून, वेळप्रसंगी यासाठी आंदोलनही उभे केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Homeघरthaneठाणे