भिवंडीतील कापड उद्योगावर गोदाम व्यवसायाची मात
By Admin | Updated: August 10, 2015 23:35 IST2015-08-10T23:35:38+5:302015-08-10T23:35:38+5:30
पारंपरिक व्यवसायामधून शहरात प्रगत झालेल्या कापड व्यवसायाचे नियोजन नसल्याने त्यावर गोदाम व्यवसायाने सध्या मात केली असून शहरातील यंत्रमाग व्यापारी व कापड व्यापाऱ्यांनी आपल्या

भिवंडीतील कापड उद्योगावर गोदाम व्यवसायाची मात
- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
पारंपरिक व्यवसायामधून शहरात प्रगत झालेल्या कापड व्यवसायाचे नियोजन नसल्याने त्यावर गोदाम व्यवसायाने सध्या मात केली असून शहरातील यंत्रमाग व्यापारी व कापड व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाचे योग्य नियोजन केले नाही तर शहरातील हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.
भिवंडीत गेल्या ७० वर्षांपासून यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय सुरू असून यापूर्वी येथे हातमागावर कापड विणून त्याची वाहतूक होड्या व जहाजांमधून होत होती. मात्र, आता सर्व सोयीसुविधा उपलब्ध असताना केवळ शहरात व्यावसायिक नियोजन नसल्याने येथील कापड उद्योगावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जुन्या यंत्रमागाची शटललेस यंत्रमागाशी स्पर्धा सुरू झाली आहे. जुन्या यंत्रमागावर कापड कमी विणले जात असून वीजबिल जास्त येते. ही तफावत लपविण्यासाठी अनेक कापड व्यापारी व कापड विणून देणारे यंत्रमागमालक कापड उद्योगात मंदी आल्याची आवई उठवून सरकारी फायदे उठवितात. त्यामुळे काही दिवस हा व्यवसाय तग धरतो. कायमस्वरूपी व्यवसायास संजीवनी मिळविण्यासाठी व्यापारी व लोकप्रतिनिधीदेखील उदासीन आहेत.
या व्यवसायाच्या निमित्ताने लोकसंख्येत झालेल्या वाढीने शहराची अवस्था बकाल झाली आहे. कारखान्यात यंत्रमाग चालविणे, कमी वेतन हाती पडणे तसेच वाढीव खर्चाबरोबर इतर खर्चांचा बोजा पडल्याने कामगारांचे प्रमाण कमी झाले. तर गोदामात जास्त पगार आणि वेळेनुसार काम मिळत असल्याने ते गोदामाकडे जास्त वळू लागले.