शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

...अन्यथा ठाण्यातील नवीन बांधकामांवर बंदी घालू -उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:29 AM

ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू, असा इशारा उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला गुरुवारी दिला.

मुंबई - ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू, असा इशारा उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला गुरुवारी दिला.दवले येथील गावदेवी मित्र मंडळाने महापालिकेच्या बेकायदा कृत्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर होती.याचिकेनुसार, दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित करण्यात आले नसतानाही महापालिका या ठिकाणी बेकायदेशीरपणे कचरा टाकत आहे. महापालिका सीआरझेडचे उल्लंघन करत आहे. कचºयामुळे खारफुटी नष्ट होत आहे. भर म्हणून विकासकही खारफुटींवर भराव टाकून त्यावर बांधकामे करत आहेत. याच परिसरात शाळा आहे. तसेच अनेक इमारती आहेत. महापालिका शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाचे विघटन करत नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन ठाणे महापालिका करत नसल्याचा आरोपही याचिकेद्वारे करण्यात आला आहे. यावर काय उपाययोजना आखणार, अशी विचारणा ठामपाकडे करत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी ठेवली आहे.विल्हेवाट लावणे थांबवासकृतदर्शनी ठाणे पालिका दवले या ठिकाणी बेकायदेशीरपणे कचºयाची विल्हेवाट लावत आहे. या ठिकाणी कचºयाची विल्हेवाट लावणे थांबवा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही व सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटच्या नियमानुसार कचºयाची विल्हेवाट लावली नाही, तर पुढील सुनावणीस आम्ही मुंबईप्रमाणे ठाण्यातही नवीन बांधकामांना परवानगी देण्यास बंदी घालू, असा इशारा उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला दिला.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका