शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

इतर तीन ठिकाणी भाजी विक्रेते आणि ग्राहक फिरकलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 3:28 PM

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी भाजी मंडईची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी कॅडबरी वगळता शहरातील इतर तीन ठिकाणी एकही भाजी विक्रेता किंवा ग्राहक फिरकलाच नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे : जांभळी नाका येथील भाजी मंडईची गर्दी कमी व्हावी यासाठी पालिकेने दोन वेळा मंडई स्थलांतरीत केली. परंतु या दोन ठिकाणी नागरिकांची भाजी घेण्यासाठी गर्दी कायम असल्याचे उघड झाल्यानंतर अखेर गुरु वारी घोडबंदर भागातील बोरीवडे, कळव्यातील पारिसक नगर, ढोकाळी येथील हॉयलन्ड आणि रेमंड कंपनी येथील रस्त्यावर या मंडई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्र वारी याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. मात्र रेमंड कंपनी येथील पर्याय वगळता नागरिकांनी तसेच भाजी विक्रेत्यांनी या तीनही ठिकाणी अक्षरश: पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यास भाजी विक्रेते आणि नागरिक देखील उत्सुक नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.            नागरीकांना वारंवार सूचना करूनही भाजी घेणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याने ठाणे महापालिकेने जांभळी नाका परिसरातील भाजी मंडई बंद करून ही भाजी मंडई दुसºया ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा प्रयोग केला होता. त्यानुसार ही मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर ही मंडई जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर भरविण्यास सुरवात झाली होती. मात्र जांभळी नाका ते स्टेशनपर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईतील गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आवाहन करु नही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे गुरु वारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला. घोडबंदर पट्ट्यातील दोन ठिकाणी एक कॅडबरी आणि एक जागा पारसिकच्या ठिकाणी निश्चित करण्यात आली. मात्र शुक्र वारी केवळ कॅडबरी परिसरात भाजी मंडई सुरू होऊ शकली असून इतर ठिकाणी भाजी विक्र ेते आणि नागरिक फिरकलेच नाहीत.भाजी मंडई या चार ठिकणी सुरु करण्याचा निर्णय काल उशिरा झाल्याने ही माहिती सर्व भाजी विक्रेत्यांपर्यंत गेली नसावी अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जांभळी नाका परिसरातील भाजी मंडई हटवणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता तो सफल झाला असून आता हे नवीन पर्याय भाजी विक्र ेत्यांनी स्वीकारायचे की नाही तो त्यांचा प्रश्न असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMarketबाजार