भिवंडीत कपिलोत्सवाचे आयोजन; महिला मेळाव्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष लावणार हजेरी

By नितीन पंडित | Updated: March 1, 2023 18:28 IST2023-03-01T18:28:44+5:302023-03-01T18:28:52+5:30

कपिलोत्सव कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Organizing Kapilotsava in Bhiwandi; BJP state president chandrashekar bawankule will attend the women's meeting | भिवंडीत कपिलोत्सवाचे आयोजन; महिला मेळाव्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष लावणार हजेरी

भिवंडीत कपिलोत्सवाचे आयोजन; महिला मेळाव्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष लावणार हजेरी

भिवंडी:भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कपिलोत्सव-२०२३ अंतर्गत तालुक्यातील दाभाड येथे शुक्रवारी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचे उदघाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती बुधवारी कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.

कपिलोत्सव कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दाभाड येथे भव्य महिला मेळावा भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिलांसाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार विशेष पारितोषिक म्हणून अॅक्टिव्हा स्कूटर, प्रत्येकी पाच घरघंटी, शिलाई मशिन, गॅस शेगडी आणि पैठणी दिल्या जाणार आहेत. तर उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू म्हणून साडी दिली जाईल. या कार्यक्रमावेळी मराठी बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादूस यांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Organizing Kapilotsava in Bhiwandi; BJP state president chandrashekar bawankule will attend the women's meeting