उल्हासनगरात रविवारी हॅपी स्ट्रीटचे आयोजन

By सदानंद नाईक | Updated: December 2, 2023 16:59 IST2023-12-02T16:58:29+5:302023-12-02T16:59:30+5:30

रविवारी सकाळी ७ ते १० दरम्यान गौलमैदान येथे दरवर्षीप्रमाणे हॅपी स्ट्रीटचे आयोजन.

Organized Happy Street on Sunday in Ulhasnagar | उल्हासनगरात रविवारी हॅपी स्ट्रीटचे आयोजन

उल्हासनगरात रविवारी हॅपी स्ट्रीटचे आयोजन

उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी यांच्या वतीने रविवारी सकाळी ७ ते १० दरम्यान गौलमैदान येथे दरवर्षीप्रमाणे हॅपी स्ट्रीटचे आयोजन केले. नागरिकांनी हॅपी स्ट्रीट मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयलानी यांनी केले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, गोलमैदान येथे रविवारी सकाळी ७ ते १० दरम्यान हॅपी स्ट्रीटचे आयोजन दरवर्षीप्रमाणे आमदार कुमार आयलानी यांनी केले. हॅपी स्ट्रीट मध्ये विविध संघटना, शाळा, योगा केंद्र यांच्यासह इतर जण आपली कला सादर करून नागरिकांचे मनोरंजन करणार आहेत. सर्वोकृष्ट कला सादर करणार्यांना गौरविण्यात येणार आहे. 

नागरिकांनी हॅपी स्ट्रीट मध्ये सहभागी होण्याचे आयोजक आमदार कुमार आयलानी यांनी केले. आयलानी यांनी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीटला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध पक्षाचें पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, शाळा प्रशासन व नागरिकांना आमदार आयलानी यांनाही आमंत्रित केले आहे.

Web Title: Organized Happy Street on Sunday in Ulhasnagar