आॅनलाइन फसवणूक : युगुलाला अटक
By Admin | Updated: August 18, 2015 00:30 IST2015-08-18T00:30:18+5:302015-08-18T00:30:18+5:30
आॅनलाइन जाहिरातीद्वारे वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने फसवणूक करणाऱ्या युगुलाला पोलिसांनी नुकतीच अत्यंत शिताफीने अटक केली.

आॅनलाइन फसवणूक : युगुलाला अटक
मुंब्रा : आॅनलाइन जाहिरातीद्वारे वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने फसवणूक करणाऱ्या युगुलाला पोलिसांनी नुकतीच अत्यंत शिताफीने अटक केली.
येथील कौसा परिसरात राहणाऱ्या शोयब अन्सारी याने एका खाजगी वेबसाइटवर त्याचा मोबाइल विकायची जाहिरात दिली होती. त्याला प्रतिसाद देऊन शहाना खान हिने त्याला मोबाइल घेऊन रेल्वे स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील मुसा कासम इमारतीजवळ बोलविले आणि त्याच्याकडील मोबाइल याच इमारतीत राहणाऱ्या तिच्या आईला दाखवून येते, असे सांगून घेऊन गेली. इमारतीच्या दुसऱ्या जिन्याने पसार झाली होती. यापूर्वीदेखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. यामुळे सतर्कझालेल्या मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर आणि त्यांच्या पथकाने वरील इमारतीच्या परिसरातून खान हिला तसेच तिला साथ देणारा हासिफ शेख यालादेखील अटक केली आणि त्याच्याकडील तीन मोबाइल ताब्यात घेतले.