एकतर्फी प्रेमातून ठाण्यात मजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:15 IST2018-12-05T22:11:20+5:302018-12-05T22:15:16+5:30

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात जंक्शन येथील एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी (बुधवारी) घडली.

One-sided love for Thane worker's suicide | एकतर्फी प्रेमातून ठाण्यात मजुराची आत्महत्या

वाघबीळ भागातील घटना

ठळक मुद्देवाघबीळ भागातील घटनाझाडाला घेतला गळफासकासारवडवली पोलीस ठाण्यात नोंद

ठाणे : एकतर्फी प्रेमातून ठाण्याच्या वाघबीळ भागात राहणाऱ्या सरोज पाटणदिन (२२) या बिगारी कामगाराने चिंचेच्या झाडाला रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाघबीळ, आनंदनगर जंक्शनजवळील एका भिंतीवर आत्महत्येपूर्वी त्याने ‘स्वत:चे आणि एका मुलीचे नाव टाकून ‘मै तनहा हूँ, असे लिहिले आहे. कासारवडवली पोलिसांनी शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला. एकतर्फी प्रेमातून नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
.......................
अशाच प्रकारची तिसरी घटना
ठाण्यात यापूर्वीही अशाच प्रकारे झाडाला गळफास घेऊन गेल्या सहा महिन्यात तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. उपवन परिसरात एका ३५ वर्षीय सुरक्षा रक्षकाने महागाईला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली. तर इंदिरानगर भागात एका मद्यपीने दारुच्या नशेतच इंदिरानगरच्या डोंगरातील झाडाला आत्महत्या केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. सरोजले मात्र एकतर्फी प्रेमातून मी एकटा पडलोय असे म्हणत वाघबीळ येथील झाडाला रस्साने गळफास घेतला.

Web Title: One-sided love for Thane worker's suicide