उल्हासनगरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 23:17 IST2019-11-04T23:16:51+5:302019-11-04T23:17:13+5:30
कॅम्प नं-4 कुर्ला कॅम्प परिसरातील जलकुंभा जवळ रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान कुष्णा नावाच्या इसमावर गोळीबार झाला.

उल्हासनगरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी
उल्हासनगर : कॅम्प नं-4 कुर्ला कॅम्प परिसरातील जलकुंभा जवळ रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान कुष्णा नावाच्या इसमावर गोळीबार झाला. कुष्णा याच्या डोक्यात गोळी लागली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्र तेरे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्यात आला. गोळीबार कोणी व कोणत्या कारणातून झाला. याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.