उल्हासनगरात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 10:58 IST2021-12-25T10:56:41+5:302021-12-25T10:58:05+5:30

Ulhasnagar News : अपघातात जखमी झालेले सनके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

One killed in Ulhasnagar car crash | उल्हासनगरात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

उल्हासनगरात कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील पवई चौकातून १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विलास सनके हे पायी जात असताना एका कारने धक्का दिला. अपघातात जखमी झालेले सनके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गीता मेनन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-३ पवई चौकातून कल्याण येथे राहणारे विलास तयप्पा सनके १८ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी एम एच-०५, ई क्यू-८५३७ क्रमांकाच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेले विलास सनके यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी कार चालक गीता मेनन हिच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत. पवई चौकात वाहनांची संख्या मोठी असून याठिकाणी प्रांत कार्यालय व सहायक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे. चौकात वाहतूक पोलिसासह वॉर्डन तैनात केल्यास अपघाताची संख्या कमी होणात असल्याची मागणी होत.

 

 

Web Title: One killed in Ulhasnagar car crash