उल्हासनगरात सार्वजनिक विजेच्या खांबातील विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By सदानंद नाईक | Updated: June 25, 2024 19:32 IST2024-06-25T19:31:35+5:302024-06-25T19:32:07+5:30

या प्रकाराला महापालिका व महावितरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

One dies due to electric shock from public electricity pole in Ulhasnagar | उल्हासनगरात सार्वजनिक विजेच्या खांबातील विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

उल्हासनगरात सार्वजनिक विजेच्या खांबातील विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

 उल्हासनगर : कॅम्प नं-५, गाऊन मार्केट येथील रस्त्याच्या बाजूच्या विधुत खांबात प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का राकेश राजेंद्र गहलानी यांना बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस तपास करीत आहेत. या प्रकाराला महापालिका व महावितरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, गाऊन मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नालीचे काम महापालिकेने सुरू केले. त्यासाठी नाली खोदण्यात आली. या खोदलेल्या जागी महावितरण विभागाचा विधुत खांब आहे. दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान राकेश राजेंद्र गहलानी यांनी खोदलेले नाली ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाला हात लावला. विजेच्या खांबात प्रवाहित झालेल्या विजेचा जोरदार धक्का राकेशला बसल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. महापालिकेने ऐन पावसाळ्यात नाली खोदली असून महावितरण विभागाने खोदलेल्या नालीतील विजेच्या खांबाची तपासणी केली नाही. दोन्ही विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस तपास करीत असून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Web Title: One dies due to electric shock from public electricity pole in Ulhasnagar