शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

एकाच दिवसात वाहतूक शाखेने केली १९४१ वाहनांवर कारवाई; सुमारे १० लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:33 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. तरीही, अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत

ठाणे : नियमांचे उल्लंघन करीत वाहतूक करणाऱ्या तब्बल एक हजार ५५३ दुचाकीस्वारांसह एक हजार ९४१ वाहन चालकांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारी कारवाई केली. या चालकांकडून नऊ लाख ७० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील १८ युनिटच्या पथकांनी २८ जून रोजी एकाच दिवसात ही कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच नागरिकांनीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही दुचाकीवरुन डबल सीट, रिक्षा तसेच मोटारकार आणि कॅबमध्येही दोनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती उपायुक्त काळे यांना मिळाली होती.या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कळवा युनिटने सर्वाधिक १८६ दुचाकींवर, अंबरनाथ युनिटने सर्वाधिक २७ रिक्षांवर तर कोनगाव युनिटने सर्वाधिक ३५ मोटारकारमधून जादा प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली. संपूर्ण आयुक्तालयात अशा एक हजार ५५३ दुचाकी, १६६ रिक्षा तर २२२ मोटारकारवर कारवाई करण्यात आली. प्रत्येक वाहन चालकांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला असून काहींचा ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कल्याण-डोंबिवलीत ३२८ वाहनचालकांना दंडकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घातलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी रविवारी कल्याण-डोंबिवलीतील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी, अशा ३२८ वाहनांवर कारवाई केली. तसेच संबंधित चालकांना ई-चलनद्वारे दंड ठोठावला आहे.कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवासासाठी परवानगी होती. परंतु, सध्या इतर वाहनांना परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, दुचाकीवर केवळ चालकच असेल, तर रिक्षा आणि मोटारीमध्ये चालकासह दोघांना प्रवासास परवानगी आहे. मात्र या नियमांचे सर्रासपणे वाहनचालकांकडून उल्लंघन होत असल्याने वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाईला सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान काही वाहने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. तरीही, अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत. त्यामुळेच कडक नाकाबंदी केली आहे. अनावश्यक आणि जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस