अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात एक कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:38 AM2020-02-16T01:38:09+5:302020-02-16T01:38:12+5:30

प्रस्ताव महासभेत । रस्त्यांची कामे होणार

One crore works in the minority majority area | अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात एक कोटींची कामे

अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात एक कोटींची कामे

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागासवर्गीय निधीअंतर्गत विविध भागांचा विकास केला जात असताना अल्पसंख्याकबहुल नागरी क्षेत्राचाही विकास करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. यात एक कोटी १५ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने २० फेबु्रवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

जनगणना विभागाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे शहरी भागात सात लाख ७४ हजार ९६१ एवढी अल्पसंख्याकांची लोकसंख्या आहे. यामध्ये मुस्लिम पाच लाख ६० हजार ९४४, ख्रिश्चन एक लाख नऊ हजार ६८४, शीख २१ हजार ५०४ आणि जैन ८२ हजार ८३७ अशी मिळून सात लाख ७४ हजार ९६९ एवढी लोकसंख्या आहे. त्यानुसार, कोपरी भागातील प्रभाग क्रमांक १७ मधील इंदिरानगर परिसरात काँक्रिटीकरण करण्यासाठी २० लाख, हाजुरी गाव येथील गल्ल्यात काँक्रिटीकरण ३० लाख, प्रभाग क्रमांक १८ येथील मशीद परिसरातील गल्ल्यात काँक्रिटीकरण ३० लाख तसेच याच भागाला लागून असलेल्या भागासाठी २० लाख, हाजुरी येथील पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी १५ लाख असा एक कोटी १५ लाखांचा निधी आता खर्च करण्यात येणार आहे.

या भागाला प्राधान्य
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघास प्राधान्य दिले असून अल्पसंख्याकबहुल नागरी क्षेत्र विकास योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीतून कोपरी-पाचपाखाडी परिसरात प्रामुख्याने अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा समावेश आहे.

Web Title: One crore works in the minority majority area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे