ठाण्यात बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक; एक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:39 IST2019-08-13T14:25:23+5:302019-08-13T14:39:57+5:30
ठाण्यामध्ये बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

ठाण्यात बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक; एक फरार
ठळक मुद्देठाण्यामध्ये बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. दोन लाख 83 हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत.एक जण फरार झाला आहे.
ठाणे - ठाण्यामध्ये बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय चलनातील पाचशे रूपयांच्या 566 बनावट नोटा विक्रीसाठी बाळगणाऱ्या काळूराम इंदवाळे (40) या मजूराला ठाणेपोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी काळूरामकडून दोन लाख 83 हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत. तर त्याचा साथीदार कांती मोकशे हा फरार झाला असून दोघे शहापूर येथील रहिवासी आहेत. ही कारवाई सोमवारी ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेस्ट गुन्हे शाखेने ठाण्यातील तीन हात नाका येथील आरटीओ कार्यालयाजवळ केली. याप्रकरणी वागळे इस्टेस्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.