Video: जव्हारमध्ये जुन्या पोलीस लाईन चाळीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 11:30 IST2021-11-17T11:24:56+5:302021-11-17T11:30:47+5:30
जुनी व लाकडी चाळ असल्याने आगीचा भडका वाढत गेला.

Video: जव्हारमध्ये जुन्या पोलीस लाईन चाळीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली
- हुसेन मेमन
जव्हार: जव्हारमध्ये मुख्य बाजारपेठेत असलेली जुन्या पोलीस लाईन चाळीला भीषण आग लागली, अग्निशमन दलाचे व स्थानिकांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली.
जुनी व लाकडी चाळ असल्याने आगीचा भडका वाढत गेला, दरम्यान प्रथम शोभा आळे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराला आग लागली, त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले, यात शेजारील काही घरांना झळ बसली असून, घरांचे व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.
जव्हार: जव्हारमध्ये मुख्य बाजारपेठेत असलेली जुन्या पोलीस लाईन चाळीला भीषण आग लागली, अग्निशमन दलाचे व स्थानिकांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टाळली. pic.twitter.com/coS3KbaRuW
— Lokmat (@lokmat) November 17, 2021