अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: February 23, 2024 21:57 IST2024-02-23T21:57:24+5:302024-02-23T21:57:34+5:30
श्रीनगर पोलिसांची कारवाई, वागळे इस्टेटमधील घटना

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धास अटक
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : वागळे इस्टेट भागातील सार्वजनिक शौचालयाच्या छतावरील खाेलीत १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय महावीर बुंबक या आराेपीला दक्ष नागरिकांच्या मदतीने अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
वागळे इस्टेट वाल्मीकी पाडा भागातील सार्वजनिक शौचालयाच्या छतावरील खाेलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा संतापजनक प्रकार २२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आला. हा प्रकार लक्षात येताच त्याला त्याच्या घरातच या नागरिकांनी रंगेहात पकडले. त्याने यापूर्वीही ५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १२:३० ते २२ फेब्रुवारी या काळात तिला धमकी, दमदाटी आणि काही पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध केल्याचेही चौकशीत उघड झाले.
याप्रकरणी बलात्कार, मारहाण, धमकी देण्यासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने आरोपी बुंबक याला अटक केली आहे.