शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जुना कसारा घाट आज होणार सुरू, तहसीलदारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:13 AM

यंदाही पावसामुळे जिल्ह्यातील कसारा घाट व माळशेज घाटातील विविध समस्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवली आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : यंदाही पावसामुळे जिल्ह्यातील कसारा घाट व माळशेज घाटातील विविध समस्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवली आहे. जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून १५ दिवसांपासून काम सुरू आहे. मात्र, नियोजनानुसार १७ आॅगस्टला हा मार्ग सुरू करण्याचे संकेत आहेत.मुंबई-आग्रा हा राष्टÑीय महामार्ग कसारा घाटातून जातो. मात्र, जुलैअखेर या जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे गेले होते. मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली. या घाटातील महामार्गावर सुमारे ५०० मीटर रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे या मार्गावरील जीवघेणी वाहतूककोंडी संपवण्यासाठी नव्या कसारा घाटातील महामार्गाने वाहतूक वळवून जुन्या कसारा घाटातील काम युद्धपातळीवर हाती घेतले. सुमारे १५ दिवसांपासून ते सुरू आहे. यामुळे या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद केली आहे.जुन्या कसारा घाटातील रस्त्याला पडलेल्या भेगा दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. या कामात अडथळा नको म्हणून मुंबईहून नाशिकला जाणारी आणि नाशिकहून मुंंबईला येणारी वाहतूक नव्या कसारा घाटातून गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडीला चालक सामोरे जात आहेत. पण, आता जुन्या घाटातील रस्त्यांचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. ठेकेदाराने १७ आॅगस्टपर्यंतचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही दिलेले आहे. यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत जुन्या कसारा घाटातून वाहतूक सुरळीत सुरू होण्याची अपेक्षा शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता या घाटातील जीवघेण्या वाहतूककोंडीतून चालकांची सुटका होणार आहे.माळशेज घाटातील वाहतूक सुरळीतमाळशेज घाटात शुक्रवारी काही ठिकाणी किंचित दरडी कोसळून रस्त्यावर माती पडली. मात्र, या घाटातील वाहतूक खोळंबू न देता ती सुरळीत असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे