शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

कंत्राटी सफाई कामगाराकडून मलमपट्टी, भीमसेन जोशी रूग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 2:17 AM

मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भार्इंदर : मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आधीच विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप असून आता घडल्या प्रकाराने येथील रूग्णांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महापालिकेच्या जोशी रुग्णालयात शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभागच नसून रूग्णालय केवळ नावापुरतेच आहे. चांगले डॉक्टर व वैद्यकीय सुविधा नसल्याने उपचाराच्या आशेने येणाऱ्या रूग्णांचे अतोनात हाल झाल्याचे अनेक किस्से आहेत. उपचाराअभावी काही रुग्णांचा बळी गेला असून अगदी लहान मूल दगावण्यासह रेल्वे स्थानकात प्रसूती होण्याची वेळ महिलेवर आलेली आहे. पालिकेच्या महिला डॉक्टरांनाही येथे योग्य उपचार न झाल्याचा वाईट अनुभव आला होता.महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मात्र नागरिकांना चांगली व माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवण्यात स्वारस्य नसून हे रूग्णालयच सरकारच्या ताब्यात देऊन आपले हात झटकण्याची घाई लागलेली होती. त्यातूनच सरकारने आता हे रूग्णालय आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली घेतले असले तरी बाकी सर्व व्यवस्था, खर्च, कर्मचारी आदी पालिकेनेच द्यायचे आहेत. परंतु पालिका आणि राजकारणी या रूग्णालयात घडणाºया घटनांपासून आपले हात झटकण्यासाठी सतत सरकारकडे बोट दाखवत आले आहेत.रुग्णालय पालिकेचे आणि सरकारच्या प्रशाकीय नियंत्रणाखाली असताना जखमी रूग्णांची मलमपट्टी चक्क कंत्राटी सफाई कामगार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुर्धा येथे राहणारा समीर म्हादे हा तरुण दुचाकीवरून पडल्याने डोके, हात, पायास जखमा झाल्या होत्या. त्यासाठीचे उपचार जोशी रुग्णालयात सुरु होते. रविवारी सकाळी आठ वाजता समीर हा पट्टी बदलण्यासाठी गेला होता.जखम साफ करुन पट्टी बदलणे यासारखी कामे ही कुशल परिचारक वा वॉर्डबॉयने करणे आवश्यक असताना तेथे असलेला परिचारक रामकृष्ण यांनी आधीची पट्टी काढून जखम साफ करुन नवीन पट्टी लावण्यासाठी तेथे सफाई काम करत असलेला कंत्राटी सफाई कामगार रोहन याला सांगितले. रोहनने समीरची मलमपट्टी करुन दिली. नंतर तो त्याच्या साफसफाईच्या कामास लागला. हा प्रकार समीरकडून समजल्यावर युवा प्रतिष्ठानचे श्रेयस सावंत - भोसले, गणेश बामणे, आशिष लोटणकर, सुनील कदम, ऋषिकेश नलावडे, निखिल पाटील, विशाल अग्रहरी आदी तरुणांनी थेट रुग्णालयात जाऊन जाब विचारला. रविवार असल्याने डॉक्टरच नव्हते.पोलिसात तक्रार दाखलपरिचारक रामकृष्ण याला विचारणा केली असता त्याने रुग्णालयात पट्टी बदलणे आदी कामे ही सफाई कामगारच करत असल्याचे सांगितले. हे ऐकून या तरूणांना धक्काच बसला. रूग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार असल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात या बाबत लेखी तक्रार करुन रुग्णालयाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. हे निवेदन महापालिकेला देखील देणार असल्याचे बामणे यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरhospitalहॉस्पिटल