शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या माथी स्वच्छता मोड अ‍ॅप; पालिका स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठीचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:27 IST

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचा यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी आयोजित बैठकीत सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना स्वच्छता मोड मोबाईल अ‍ॅप अधिकाधिक लोकांना डाऊनलोड करण्याकरिता प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचा यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी आयोजित बैठकीत सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना स्वच्छता मोड मोबाईल अ‍ॅप अधिकाधिक लोकांना डाऊनलोड करण्याकरिता प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांनी पालिकेच्या स्वच्छतेला अधिकाधिक समाधानकारक ठरविल्यास पालिकेचा स्वच्छता सर्व्हेक्षणात वरचा क्रमांक लागण्याची शक्यता यामागे वर्तविली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छतेची पारदर्शक मोहीम सुरू केल्यानंतर शहराच्या स्वच्छतेला गती मिळू लागली. मात्र ती ठराविक काळापुरती मर्यादित न राहता कायमस्वरुपी राखण्यात यावी, यासाठी मात्र ठोस उपाय योजले जात नसले तरी गांधी जयंतीला मात्र स्वच्छतेची आठवण सर्वच क्षेत्रात हिरिरीने ठेवली जाते. स्थानिक प्रशासनाच्या स्वच्छतेला प्रोत्साहित करण्यासाठी गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने देशभर स्वच्छता सर्व्हेक्षण सुरू केल्याने सर्व स्थानिक प्रशासनाची स्वच्छता राखण्यात चढाओढ सुरू झाली. मीरा-भार्इंदर पालिकेने देखील व्हीएमएस माय सिटी हे असुविधांची तक्रार करणारे मोबाईल अ‍ॅप सुरू केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छता मोड हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. त्यामुळे पालिकेने सुरू केलेले माय सिटी अ‍ॅप मागे पडून नवीन स्वच्छता मोड अ‍ॅपला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आले.या अ‍ॅपद्वारे शहरातील स्वच्छतेला गुण देण्याचे आवाहन प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. अखेर पार पडलेल्या सर्व्हेक्षणात पालिकेने देशात १३० वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकावला. त्यावेळी १०० टक्के कचरा वर्गीकरणासह हगणदारीमुक्ती व स्वच्छता मोडच्या असमाधानकारक प्रतिसादाने पालिकेचा घात केला. त्यामुळे यंदा प्रशासनाने शहराला १०० टक्के हगणदारीमुक्त केल्यासह कचरा वर्गीकरणाला प्राधान्य दिले.मात्र यावर समाधान न मानता आयुक्तांनी यंदाच्या सर्व्हेक्षणात पालिकेला अव्वल क्रमांक मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्वच्छतेच्या आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सोमवारी सर्व अधिका-यांची आपल्या दालनात बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी सर्व अधिका-यांना स्वच्छता मोड हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना दिले. त्यात शहरातील विविध भागांतील स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या 24 पालक अधिका-यांसह सर्व विभागप्रमुख, प्रभाग अधिकाऱ्यांना १ हजार, बाजार विभाग प्रमुख नरेंद्र पाटील यांना २५ हजार, शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांना २० हजार, उद्यान अधीक्षक नागेश विरकर, हंसराज मेश्राम यांना प्रत्येकी २ हजार, लिपिक ते सफाई कामगारांना किमान १०० नागरिकांना ते अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी शहरातील स्वच्छतेचा समाधानकारक प्रतिसाद लोकांकडून त्या अ‍ॅपद्वारे मिळविण्याच्या कामाला लागल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर आयुक्तांनी भार्इंदर पश्चिमेकडील रिना मेहता महाविद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेसह ते अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लोकांना आवाहन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर