तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 01:45 IST2020-01-22T00:06:22+5:302020-01-22T01:45:13+5:30

तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला.

Offense against third-degree student for beating, raping a teacher | तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करून मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

मीरा रोड : मीरा रोड येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी संबंधित खाजगी शिकवणीच्या शिक्षिकेविरुध्द नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शांतीनगर भागात राहणाºया पीडित मुलीस तिचे पालक सेक्टर १०, सी-६३ इमारतीमध्ये खाजगी शिकवणी घेणाºया लता नावाच्या महिलेकडे शिकवणीसाठी पाठवत होते. गेल्या महिन्यात लताने पीडित मुलीस होमवर्क केला नाही म्हणून तिची लेगिंग खाली खेचून पायावर आणि मांडीवर छडीने मारले होते. त्यामुळे तिच्या मांडीवर काळे, निळे व्रण उठले होते. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने लता यांची भेट घेऊन मुलीला मारू नका, कपडे उतरवण्याची शिक्षा करू नका, जेणेकरून अन्य मुले तिला चिडवतील. ती शिकेल तशी तिला शिकू द्या, असे तिच्या आईने सांगितले होते. परंतु १७ जानेवारी रोजी मुलगी शिकवणीवरुन दुपारी घरी परतली असता तिने पाय दुखत असल्याचे आईला सांगितले. तिला चालताना त्रास होत होता.

मुलीचे सुजले पाय
चौकशी केली असता, लताने तिला अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून तब्बल ४५० उठाबशांची शिक्षा केल्याचे समजले. या शिक्षेमुळे तिच्या मांड्या आणि पोटºया सुजून चालण्यास त्रास होत होता. या प्रकारानंतर मुलीच्या आईने नयानगर पोलीस ठाण्यात लताविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offense against third-degree student for beating, raping a teacher